महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीतील कोरोना आटोक्यात; 13 दिवसात 217 रुग्णांची नोंद - Dharavi corona update

धारावीत गेल्या 13 दिवसात 217 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा 9 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे.

DHARAVI CORONA
धारावीतील कोरोना

By

Published : May 13, 2021, 7:46 PM IST

मुंबई -आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील महिन्यात दिवसाला 70 हुन अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गेल्या 13 दिवसात 217 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसात तिसऱ्यांदा 9 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे.

धारावीत 616 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. 2 फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात 334 रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात 7 ते 11 हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत 8 मार्चला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. 18 मार्चला ही रुग्णसंख्या 30 वर पोहचली होती. 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात 1 मे ला 28 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. 10, 11 आणि आज 13 मे ला दिवसाला 9 रुग्णांची नोंद झाली आहे. आज गुरुवारी धारावीत 9 नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील रुग्णसंख्या 6662 वर गेली आहे. त्यापैकी 5702 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 616 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा -देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना मॉडर्नाची लस कशी दिली जाते - नवाब मलिकांचा सवाल

धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -

मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत 1 एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. 24 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी, 2 फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत 6 लाख 82 हजार रुग्ण

मुंबईत 6 लाख 82 हजार 102 कोरोनाचे एकूण रुग्ण आहेत. त्यापैकी 14 हजार 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 27 हजार 373 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 38 हजार 859 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 176 दिवस इतका आहे.

धारावीतील रुग्णसंख्या

दिनांक रुग्णसंख्या
1 मे 28
2 मे 24
3 मे 18
4 मे 22
5 मे 24
6 मे 13
7 मे 18
8 मे 18
9 मे 13
10 मे 9
11 मे 9
12 मे 12
13 मे 9

धारावीत एकूण रुग्ण - 6662
रुग्ण बरे झाले - 5702
सक्रिय रुग्ण - 616

हेही वाचा -'कोरोना एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार'

ABOUT THE AUTHOR

...view details