महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'या' मतदारसंघांमध्ये बंडखोर ठरले किंगमेकर - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

विविध मतदारसंघांमध्ये पक्षाने तिकीट डावलल्याने स्थानिक नेत्यांनी बंडखोरी केली. या मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका पक्षाने तिकीट दिलेल्या उमेदवाराला बसला आहे.

'या' मतदारसंघांमध्ये बंडखोर ठरले किंगमेकर

By

Published : Oct 25, 2019, 6:11 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 तारखेला जाहीर झाले. या निकालाने अनेक मतदारसंघांमधील राजकीय नेतृत्वात बदल घडवला. निवडणुकीच्या तोंडावर युतीकडे पक्षांतराच्या राजकीय वाऱ्यात अनेक नेते वाहून गेले. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांनी ऐनवेळी पक्षबदल केले आणि युतीच्या तिकीटावर निवडणूक लढवून राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला.

काही ठिकाणी या बंडखोरांना यश मिळाले आहे. परंतु, काही ठिकाणी झालेल्या बंडखोरीचा फटका त्याच पक्षाच्या उमेदवाराला बसल्याने या महत्त्वाच्या जागांवर पक्षांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

उरण
रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघात अपक्ष (भाजप बंडखोर) महेश बालदी विजयी झाले आहेत. सेनेचे आमदार मनोहर भोईर यांना पाडण्यात बंडखोर बालदी यांना यश आले.
महेश बालदी : भाजप बंडखोर (अपक्ष) 74463
मनोहर भोईर : (शिवसेना) 68745
विवेक पाटील : (शेकाप) 61456

करमाळा
मागील निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेल्या नारायण पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते.
यंदा त्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रश्मी बागल यांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा विजय झाला आहे.
संजय शिंदे : (अपक्ष) 78822
नारायण पाटील : शिवसेना बंडखोर (अपक्ष) 73328
रश्मी बागल : (शिवसेना) 53295

वांद्रे पूर्व
वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. या मतदारसंघात पक्षाने मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सेनेचे अधिकृत उमेदवार महाडेश्वर यांना पराभव स्वीकारावा लागला असून, वांद्रे पूर्व मधून काँग्रेसचे झिशन सिद्धकी विजयी झाले आहेत.
झिशन सिद्दकी : (काँग्रेस) 38,337
विश्वनाथ महाडेश्वर : (शिवसेना) 32,547
तृप्ती सावंत : शिवसेना बंडखोर (अपक्ष) 24,071

मुक्ताईनगर
मुक्ताईनगर मतदारसदनघत सलग सहा वेळा विजय मिळवलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकीट डावलून त्यांचाच कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले. परंतु या मतदारसंघात शिवसेनेचे बंडखोर व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंचा 1927 मतांनी पराभव केला.
चंद्रकांत पाटील : शिवसेना बंडखोर (अपक्ष) 91092
रोहिणी खडसे : (भाजप) 89135
राहूल पाटील : (वंचित बहुजन आघाडी) 9751

रावेर
जळगावमधील रावेरमध्ये विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्या विरोधात भाजप बंडखोर अनिल चौधरी यांनी 44 हजारांहून जास्त मते मिळवल्याने या मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष चौधरी पुन्हा निवडून आले आहेत.
शिरीष चौधरी : (काँग्रेस) 77941
हरिभाऊ जावळे : (भाजप) 62332
अनिल चौधरी : (अपक्ष) 44841

बार्शी
राष्ट्रवादीचे दिलीप सोपल यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु या मतदारसंघातून भाजपच्या राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी केली. निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोर राऊत या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
राजेंद्र राऊत : भाजप बंडखोर (अपक्ष) 93,961
दिलीप सोपल : (शिवसेना) 91316

ABOUT THE AUTHOR

...view details