महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bappi Lahiri Passes Away, LIVE Updates : बप्पी लहिरी यांच्या पार्थिवावर मुलगा आल्यानंतर मुंबईत होणार अंत्यसंस्कार - गायक बप्पी लहिरी यांचे निधन

Bappi Lahiri Passes Away
बप्पी लहिरी

By

Published : Feb 16, 2022, 10:00 AM IST

Updated : Feb 16, 2022, 8:56 PM IST

16:29 February 16

बप्पी लहिरी यांचे पार्थिव निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले

बप्पी लहिरी यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचं दर्शन घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्री काजोल, गायक अलका याग्निक, गायक अभिजीत भट्टाचार्य यांचाही समावेश आहे.

13:24 February 16

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

09:56 February 16

अभिनेता अक्षय कुमारने बप्पी लहिरी यांना श्रद्धांजली वाहिली.

09:52 February 16

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने वाहिली श्रद्धांजली

09:44 February 16

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बप्पी लहिरी यांना वाहिली श्रद्धांजली

गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. बप्पी लाहिरी यांचे संगीत सर्वसमावेशक होते. विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते, असे पंतप्रधानांनी ट्विट केले.

09:19 February 16

Bappi Lahiri Passes Away, LIVE Updates : बप्पी लहिरी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी वाहिली श्रद्धांजली!

मुंबई -प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी यांचे निधन झाले. 'बप्पी दा' नावाने ओळखले जाणारे संगीतकार 69 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. निद्रानाशामुळे त्यांचे निधन ( Singer-composer Bappi Lahiri passes away at 69 ) झाल्याचे डॉक्टर दीपक नामजोशी सांगितले. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या महिन्यात बॉलिवूड जगताला एकापाठोपाठ एक मोठे धक्का बसले आहेत. बप्पी लहिरी यांच्या आधी स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. बप्पी लहिरी यांच्या निधनावर राजकीय नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.

आपल्या चाहत्यांमध्ये ते ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. त्यांनी 70-80च्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपटांना संगीत दिले. बप्पी लाहिरी यांनी 1970-80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली. तसेच 'डिस्को डान्सर' या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. तर भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते. आज त्यानी वयाच्या 69 वर्षी मुंबईत रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना झाल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लाहिरी आणि त्यांची मुलगी गायिका रेमा लाहिरी बन्सल असे कुटुंब आहे.

हेही वाचा -The Great Freedom Fighter Tatya Tope : जाणून घ्या! नाना साहेबांचे उजवे हात असलेले स्वातंत्र्य सैनिक तात्या टोपे यांची वीरगाथा

Last Updated : Feb 16, 2022, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details