महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raveena Tandon Father Passes Away : रवीना टंडनला पितृशोक; निर्माते रवी टंडन यांचे निधन - raveena tandon father passes away

निर्माते रवी टंडन यांचे आज ११ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन ( raveena tandon father passes away ) झाले आहे. रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे त्यांच्या मुंबईतील जुहू येथील घरी वृद्धापकाळाने ( Ravi Tandon Passes Away ) निधन झाले. रवीना टंडनने इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे.

Raveena Tandon Father Passes Away
निर्माते रवी टंडन यांचे निधन

By

Published : Feb 11, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 11, 2022, 3:40 PM IST

मुंबई -निर्माते रवी टंडन यांचे आज ११ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन ( raveena tandon father passes away ) झाले आहे. रवी टंडन यांचे शुक्रवारी पहाटे त्यांच्या मुंबईतील जुहू येथील घरी वृद्धापकाळाने ( Ravi Tandon Passes Away ) निधन झाले. रवीना टंडनने इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे.

रवीना टंडन हिची पोस्ट

राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास -

मिळालेल्या माहितीनुसार, रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे शुक्रवारी 11 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रवी टंडन यांची श्वसनक्रिया बंद पडल्याने त्यांचे निधन झाले. आज पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बॉलीवूडमधील उत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते आणि त्यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते, ज्यात ‘खेल खेल में’, ‘अनहोनी’, ‘नजराना’, ‘मजबूर’, ‘जिंदगी’ यांचा समावेश आहे.

रवीनाने लिहिली भावनिक पोस्ट -

रवीनाने ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. तिने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करुन एक पोस्ट शेअर केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही नेहमी माझ्यासोबत आहात, मी नेहमी तुमचीच असेन, मी कधीही तुम्हाला जाऊ देणार नाही. लव्ह यू पापा.” अशी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

रवी टंडन यांच्या निधनाबद्दल अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला.

Last Updated : Feb 11, 2022, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details