महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Couple : नवनीत राणांची अखेर सुटका; तपासणीसाठी लीलावती रूग्णालयात दाखल - Navneet rana

दंडाधिकाऱ्यांकडून सुटकेचा आदेश देण्यात आला. एक पथक भायखळा आणि एक पथक तळोजा कारागृहात जाऊन त्यांची सुटका केली नवनीत राणाला भायखळा महिला कारागृहात तर रवी राणाला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.

Rana Couple
Rana Couple

By

Published : May 5, 2022, 12:46 PM IST

Updated : May 5, 2022, 3:19 PM IST

मुंबई - अपक्ष खासदार नवनीत राणा आज १३ दिवसांनी भायखळा ( Navneet Rana Released From Jail ) तुरुंगातून बाहेर आले आहे. दोन्ही बाजूंकडून गुरुवारी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे जामीनपत्र बोरिवली न्यायालयात जमा करण्यात ( Rana Couple Get Bail ) आले. तसेच जामिनाच्या प्रती बंद लिफाफ्यात सुटकेचे आदेश देण्यात आले. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांकडून सुटकेचा आदेश देण्यात आला. एक पथक भायखळा आणि एक पथक तळोजा कारागृहात जाऊन त्यांची सुटका केली. नवनीत राणाला भायखळा महिला कारागृहात तर रवी राणाला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना लवकर सोडून लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे नेते किरीट सोमैय्या ( Kirit Somaiya Meet With Navneet Rana ) नवनीत राणा यांच्या भेटीला लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहे.

राणा दाम्पत्याची अखेर सुटका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्‍या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली होती. न्यायालयाने राणा दाम्‍पत्‍याला जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर केला आहे. त्यांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पूर्ण झाली आहे.

नेमकं प्रकरण काय? -सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

हेही वाचा - Rana Couple Bailed : राणा दाम्पत्याला जामीन.. मात्र, कधी होणार सुटका? 'अशी' आहे सर्व प्रक्रिया

Last Updated : May 5, 2022, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details