मुंबईछत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंभू होते. शौर्य आणि धर्माचे महामेरू होते. त्यांना गुरूची गरज नव्हती. त्यांच्या गुरू या राजमाता जिजाऊ होत्या, अन्य कोणीही त्यांचे गुरु होऊ शकत नाही असा अधिकृत खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale Minister of Social Justice and Empowerment of India यांनी केला आहे. याबाबतचे एक पत्र आणि आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी पुण्यातील वक्तव्याची सारवासारव केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु संत रामदास होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळत होती, असे आक्षेपार्ह विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी Bhagatisingh Koshyari औरंगाबादेत केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी चिंचवड मधील एका कार्यक्रमात केले. रामदास आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टीका सुरु झाली. त्यानंतर रामदास आठवले यांनी आपली अधिकृत भूमिका पत्रक, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणली आहे. पिंपरीतील सुभेदार रामजी वसाहत येथे उभारलेल्या कमानीचे अनावरण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले होते. मात्र आता रामदास आठवले यांनी याबाबतची आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.