महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rada teaser ready for audience नावाप्रमाणेच ॲक्शनपट, राम शेट्टी निर्मित राडाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज - राम शेट्टी निर्मित राडा चित्रपट

नवीन मराठी चित्रपट ‘राडा’ नावाप्रमाणेच ॲक्शनपट Action Movie Rada आहे. थरारक दृश्ये, ॲक्शन सीन्स आणि बाजूला लव्हस्टोरी असलेल्या या टिझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'राडा' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Ram Shetty produced action movie Rada teaser ready for audience

Ram Shetty produced action movie Rada teaser ready for  audience
राम शेट्टी निर्मित राडा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस

By

Published : Aug 31, 2022, 11:08 AM IST

मुंबई आजकाल बॉलिवूडपटांत दाक्षिणात्य स्टाईलची ॲक्शन दिसू लागली आहे. आता तर त्याचा पगडा मराठी चित्रपटांवरसुद्धा बसू लागलाय. साऊथस्टाईलच्या ॲक्शनची भडीमार असलेला नवीन मराठी चित्रपट ‘राडा’ नावाप्रमाणेच ॲक्शनपट Action Movie Rada आहे. यातून तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपानराव नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली. गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. हा भव्य ॲक्शनपट के. प्रवीण याने कॅमेऱ्यात कैद केला आहे.



थरारक ॲक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. आता क्षणाचा विलंब न करता या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. थरारक दृश्ये, ॲक्शन सीन्स आणि बाजूला लव्हस्टोरी असलेल्या या टिझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. चित्रपटाचा टिझर पाहता साऊथ स्टाईलची कमतरता कुठेही भासत नाही आहे.



राम शेट्टी निर्मित 'राडा' Ram Shetty produced action movie rada या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांच्या भूमिका आहेत.


येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'राडा' हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Ram Shetty produced action movie Rada teaser ready for audience

हेही वाचा‘बॉईज’चे त्रिकुट पुन्हा एकदा येतंय ‘बॉईज ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला!

ABOUT THE AUTHOR

...view details