मुंबई:दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी निधन झाले ते दीर्घकाळापासून मधुमेह आणि संबंधित मूत्रपिंड यकृत रोगांशी लढत होते काही आठवड्यांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला जो त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला. ते दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते, ते दीर्घकाळ डायलिसिसवर होते आणि चांगला प्रतिसाद देत होते. त्यांना मधुमेह होता आणि नुकतीच त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती अशी माहिती ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डॉ. प्रीतित समदानी यांनी दिली आहे.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला दीर्घकाळापासून मधुमेह आणि संबंधित मूत्रपिंड-यकृत रोगांशी लढत होते. काही आठवड्यांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली होती