महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राजू शेट्टी संतप्त

सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या कचाट्यात सापडल्याने आत्महत्येशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय नसल्याचे वक्तव्य नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.

रकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या कचाट्यात सापडल्याने आत्महत्ये व्यतिरीक्त शेतकऱ्याकडे पर्याय नसल्याचे वक्तव्य नेते राजू शेट्टी यांनी केले

By

Published : Nov 21, 2019, 4:56 PM IST

मुंबई- सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या कचाट्यात सापडल्याने आत्महत्येशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याचे वक्तव्य नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, घसरणारा बाजारभाव आणि कर्ज, कर्जमाफीची अपूर्ण प्रक्रिया यामुळे राज्यभरात मागील दहा महिन्यांमध्ये 2 हजार 225 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी निदर्शनास आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शेट्टी बोलत होते.

रकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्ती यांच्या कचाट्यात सापडल्याने आत्महत्येशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याचे वक्तव्य नेते राजू शेट्टी यांनी केले

यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात ठिकठिकाणी तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी झाली. यासाठी शेतकरी संघटनांनी मोर्चेही काढले. मात्र, अद्याप राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या गडबडीत असल्याने शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात उशिर होत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटींची मदत करणार असल्याची घोषणा केली. मात्र, सरकार स्थापनेला पक्षांचे एकमत होत नसल्याने ही घोषणाही हवेत विरल्याचे चित्र आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांनी हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details