मुंबई -राज्याची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपक्रमशीलता वाढवणे, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान समुहांना सन्मानित करून समाजात त्यांची ओळख निर्माण करणे, समाजात माहिती तंत्रज्ञानाचा गतिमान वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज (शुक्रवार) दिली.
'या' पाच विभागातून निवड -
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी इंजिनियरींग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्ट-अप आणि स्पेशल अवार्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा ५ विभागात या पुरस्कारांची निवड होणार असल्याची माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुरस्कार, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप जाणार आहे.