मुंबई - पैगंबर मोहम्मद यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मांविरोधात देशभर वाद निर्माण झाला. नुपूर शर्मांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. Raj Thackeray Address to the Worker Meeting आज मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा झाला त्यामध्ये ते बोलत होते. 'झाकीर नाईकला माफीची मागणी का करत नाही, अस म्हणत जुन्या वादाला तोंड फोडले आहे.
झाकीर नाईक प्रकरणआपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, जेव्हापासून नुपूरचे वक्तव्य आले आहे, तेव्हापासून देशात बरेच राजकारण होत आहे. नुपूरला कोणीही पाठिंबा देत नाही. झाकीर नाईकनेही असेच म्हटले आहे. मात्र, त्यांच्याकडून माफीची मागणी कोणी का करत नाही, नुपूरवर माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला. नाईक यांच्याकडून माफीचे आवाहन करण्यात आले नाही. नुपूर जे बोलल्या होत्या, नाईकही तेच बोलला आहे. असही ते म्हणाले आहेत.