महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray on ED Probe : ईडीमुळे राज ठाकरे यांचा भाजप विरोधावरून यूटर्न? राज ठाकरे म्हणतात...

By

Published : Jul 24, 2022, 10:05 AM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडच्या काळात भाजपच्या बाजूने झुकल्याचे ( Maharashtra Navnirman Sena Update ) चित्र आहे. यापूर्वी ईडी चौकशी झाली असल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे

मुंबई - ईडीच्या तपासानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ED Probe ) भाजपच्या बाजूने झुकल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आजवर करण्यात आला. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. ईडीच्या तपासावर टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंनी प्रत्युत्तर ( Raj Thackeray on BJP support ) दिले आहे. ईडीच्या तपासाचा आणि भाजपचा काय संबंध? असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे आणि यूटर्न-यावेळी मुलाखतकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS chief U turn ) यांना 'तुम्ही एखादा मुद्दा घेतला तर तो अर्धवट ठेवता आणि त्यावरून यूटर्न घेता आणि ही वेळ तुमच्यावर ईडीच्या चौकशीमुळे आली. असा सातत्याने आरोप केला जातो. यावर तुमचं काय मत आहे?' असा प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मी त्यादिवशी ठाण्याच्या सभेत योग्य वेळी टीका करेन असे सांगितले होते. पण काश्मीरमधून कलम ३७० हटवले तर त्याचे अभिनंदन का नाही? चांगल्या गोष्टीचे अभिनंदन केले पाहिजे. उद्या आणखी एखाद्या नेत्यांशी बोललो तर मी तिकडे गेलो म्हणाल का? शरद पवारांशी काही शब्द बोललो तर ती पवारांशी युती आहे का?"



मोदी पवार भेट-पुढं बोलताना राज ठाकरे ( Raj Thackeray on Sharad Pawar ) म्हणाले की, "जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत आले होते तेव्हा त्यांनी मी शरदजींच बोट पकडून मी राजकारणात प्रवेश केल्याचे सांगितले होते. त्यामुळे पवार आणि मोदींनी लगेच युती केली का?" अशी सडेतोड प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.



ईडीने केली होती 9 तास चौकशी-दरम्यान, ईडीने 2019 मध्ये राज ठाकरेंची तब्बल नऊ तास चौकशी केली होती. ईडीने ठाकरे यांना आयएल अँड एफएस या खाजगी वित्तीय पायाभूत सुविधा कंपनीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततांमध्ये गुंतले आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटिसवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे ईडी कार्यायलायत गेले होते. तिथे त्यांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर मात्र राज ठाकरे यांचा भाजप विरोध मावळला असा आरोप केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details