महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

हवामान विभागाने मुंबईत पाऊस बरसेल, असा अंदाज व्यक्त केला होता. दिवसभर मुंबईचे वातावरण ढगाळ होते. अखेर संध्याकाळी पाऊस बरसला. दक्षिण मुंबई तसेच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली. रविवारी अनेक जण घरीच असल्याने लोकांनी घरातूनच पावसाचा आनंद घेतला.

पाऊस
पाऊस

By

Published : Nov 22, 2021, 12:19 AM IST

मुंबई -थंडीमध्ये जोरदार पाऊस बरसत असल्यामुळे मोसमी पाऊस खरच परत गेला आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राज्यात हिवाळ्याला सुरुवात होत असताना दुसरीकडे मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्याला तर मुसळधार पावसाने (Heavy rain) झोडपून काढले आहे. संध्याकाळपासून मुंबईतील विविध भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. दादर, माहीम, वरळी पूर्व उपनगरातही पाऊस बरसत आहे. पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने मुंबईत पाऊस बरसेल, असा अंदाज व्यक्त केला होता. दिवसभर मुंबईचे वातावरण ढगाळ होते. अखेर संध्याकाळी पाऊस बरसला. दक्षिण मुंबई तसेच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली. रविवारी अनेक जण घरीच असल्याने लोकांनी घरातूनच पावसाचा आनंद घेतला. पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के एस होसाळीकर व्यक्त केली आहे. यादरम्यान मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details