मुंबई - शहरातील लोकल रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. जीत वसंतकुमार घोष (वय 40), असे या मोबाईल चोराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 217 मोबाईल फोन जप्त केले आहेत. रेल्वेत होणाऱ्या मोबाईल चोऱ्यांपैकी ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
चोराच्या घरात सापडले 11 लाखांचे 217 मोबाईल फोन; एक जण अटकेत - रेल्वे पोलीस
मुंबई शहरातील लोकल रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 217 मोबाईल फोन जप्त केले आहेत.
रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित आरोपी मोबाईल चोरी करण्यात तरबेज असून, जप्त करण्यात आलेले 217 मोबाईल फोन चोराने स्वत:च्या घरात लपवून ठेवले होते. गरज पडेल तेव्हा मुंबईतील नागपाडा परिसरात असणाऱ्या चोर बाजारात हे मोबाईल तो स्वस्त दराने विकत होता.
आरोपी जीत घोष याच्याकडून जप्त केलेल्या 217 मोबाईल फोनची किंमत तब्बल 11 लाख 47 हजार रुपये असून, या प्रकरणात आरोपीसोबत अजून किती जणांचा सहभाग आहे यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.