महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राहुल मुखर्जी शीना बोरा विवाहित असल्याची कागदपत्रे खोटी; उलट तपासणीत राहुल मुखर्जीची कबुली - Rahul Mukherjee on Sheena Bora murder case

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात राहुल मुखर्जीने (Rahul Mukherjee on Sheena Bora murder case) मुंबई सत्र न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. राहुल मुखर्जी आणि शीना बोरा विवाहित असल्याचे खोटे डॉक्युमेंट बनवल्याची (fake marriage certificate Rahul Mukherjee and Sheena Bora) कबुली उलट तपासणीत राहुल मुखर्जीने दिली (Rahul Mukherjees confession in cross examination ). शासकीय रजिस्ट्रार कार्यालयात लिव्ह लायसेन्स ऍग्रिमेंट नोंदवताना, शीना बोरा पत्नी असल्याचं सांगितले होते.

राहुल मुखर्जी शीना बोरा विवाहित असल्याची कागदपत्रे खोटी
राहुल मुखर्जी शीना बोरा विवाहित असल्याची कागदपत्रे खोटी

By

Published : Oct 4, 2022, 2:09 PM IST

Updated : Oct 4, 2022, 10:13 PM IST

मुंबई -शीना बोरा हत्याकांड प्रकरणात राहुल मुखर्जीने (Rahul Mukherjee on Sheena Bora murder case) मुंबई सत्र न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. राहुल मुखर्जी आणि शीना बोरा विवाहित असल्याचे खोटे डॉक्युमेंट बनवल्याची (fake marriage certificate Rahul Mukherjee and Sheena Bora) कबुली उलट तपासणीत राहुल मुखर्जीने दिली (Rahul Mukherjees confession in cross examination ). शासकीय रजिस्ट्रार कार्यालयात लिव्ह लायसेन्स ऍग्रिमेंट नोंदवताना, शीना बोरा पत्नी असल्याचं सांगितले होते. अंधेरीमध्ये घर घेण्यासाठी राहुल मुखर्जीने खोटे मॅरेज सर्टिफिकेट, खोटा नोकरीचा दाखला दिला होता. हे आज उलटतपासणीत स्पष्ट झाले.

राहुल मुखर्जी शीना बोरा विवाहित असल्याची कागदपत्रे खोटी

रूम भाड्याने घेण्याकरिता बनविले खोटे कागदपत्र-राहुल मुखर्जी याने अंधेरी मध्ये भाड्याने राहण्याकरिता घरासाठी शिना बोरा सोबत 2010 साली UK मध्ये कुठेही शिना सोबत विवाह झाला असल्याचे नोंदणी सर्टिफिकेट कार्यालयाला देण्यात आले होते. हे खोटे होते तसेच राहुल मुखर्जी आणि शिना केव्हाच UK ला गेल्या नव्हत्या. हे देखील इंद्राणीच्या वकील यांनी कोर्टात सांगितल्यानंतर अखेर राहुल मुखर्जी याने कबूल केले आहे की शिना सोबत त्याचा विवाह झाला नव्हता. त्याने रूम भाड्याने घेण्याकरिता हे सर्व डॉक्युमेंट खोटे बनवले होते.



राहुलने मान्य केला गुन्हा-स्वतः न्यायाधीश यांनी हस्तक्षेप करीत विचारल्यानं मॅरेज सर्टिफिकेट बनावट असल्याचं राहुल मुखर्जीनं मान्य केलं. खोटी कागदपत्रे बनवणं हा गुन्हा असल्याचं राहुलनं केलं मान्य आहे. मी तेव्हा शिनासोबत अनऑफिशियल एंगेज होतो आमचा साखरपुडा झाला नव्हता असे साक्षीदार राहुलचा कोर्टात साक्षय देताना खुलासा आहे. राहुल यांनी वर्ष 2010 ला UK मधील खोटं मॅरेज सर्टिफिकेट सादर केले. नोकरी करत असल्याचे खोटे कागदपत्र सादर केल्याचं, इंद्राणीच्या वकिलांनी केलं कोर्टात पुराव्यासहित सिध्द आहे. शीना सोबत विवाह झाला नसताना, लग्न प्रमाणपत्र कसं सादर केलं ? मात्र या प्रश्नावर राहुलचा मला माहीत नाही. हेच उत्तर वकील रणजीत सांगळे इंद्राणीचे वकील यांनी सर्व डॉक्युमेंट कोर्टात साक्षीच्या वेळी सादर केले आहे.

9X चा कर्मचारी कधीच नसल्याचं राहुल -9X या चॅनलचा राहुल मुखर्जी कर्मचारी असल्याचे ही कागदपत्र त्यावरील स्वाक्षरी आपल्याच असल्याचं, राहुल यानं केलं मान्य आहे. मात्र आपण 9X चे कर्मचारी कधीच नसल्याचं राहुल यानं यापूर्वी सांगितलं होतं. हे डॉक्युमेंट बनवले गेले असल्याचं आणी हे शीनानं मला दिले होते असे राहुल मुखर्जी ने कोर्टात सांगितले आहे. राहुल अश्या प्रकारची खोटी कागदपत्रे बनवतो, हे सिद्ध करण्याचा, इंद्राणीच्या वकिलांचा प्रयत्न राहुल कडून 9X मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कागदपत्रांचा दुरुपयोग झाला. असे इंद्राणीच्या वकिलांनी म्हटल्यानंतर राहुल मुखर्जीने म्हटले की, ही माझ्या वडिलांची कंपनी असल्याने मी याचा उपयोग केला, असं राहुल मुखर्जीने म्हटले; मात्र त्याला इमराणीच्या वकिलाने पुन्हा विरोध करत डॉक्युमेंट सादर केले की, नाईन एक्स कंपनीची पीटर मुखर्जीची नाही.

Last Updated : Oct 4, 2022, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details