महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Traffic Police Help Minor Girl : पुण्यात माणुसकीचे दर्शन : पोलिसाने दिले चिमुरडीला नवजीवन

माणुसकी एकच धर्म.. हिंदू मुस्लिम भाई भाई असा संदेश देणारे अनेक उदाहरणे आपला पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार काल वारजे येथील पुलावर घडला आहे. खरा तो एकचि धर्म चा संदेश देत ट्राफिक पोलीस समीर बागसिराज याने चिमुरडीला नवी संजीवनी दिली ( Pune Traffic Police Help Minor Girl ) आहे.

Pune Traffic Police Help Minor Girl
पुण्यात माणुसकीचे दर्शन

By

Published : Apr 28, 2022, 2:06 PM IST

Updated : Apr 28, 2022, 2:55 PM IST

पुणे -राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्याला घेऊन राजकारण करून राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र एकीकडे असे असले तरी माणुसकी एकच धर्म.. हिंदू मुस्लिम भाई भाई असा संदेश देणारे आणि ते प्रत्येकशात आणणारे अनेक उदाहरणे आपला पाहायला मिळत आहे. असाच काहीसा प्रकार काल वारजे येथील पुलावर घडला आहे. खरा तो एकचि धर्म चा संदेश देत ट्राफिक पोलीस समीर बागसिराज याने चिमुरडीला नवी संजीवनी दिली ( Pune Traffic Police Help Minor Girl ) आहे.

पुणे ट्राफिक पोलीस चिमुकलीची मदत करताना

अन् त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले - मुंबई-पुणे हायवेवरील वारजे भागातील पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चारचाकी मोटारीला एका ट्रकने मागील बाजूने धडक दिली. मोटारीला मागून दिलेल्या धडकेमुळे दोन वाहनांमध्ये मोटार (एमएच १२ ईटी ६६३५) चढून गेली. या अपघातामध्ये मनोज पुराणिक, त्यांच्या पत्नी, दोन मुली असा परिवार जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होता. परंतु अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. या वहतूककोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले खरे, पण गर्दी इतकी भयानक होती, की त्यांना देखील हालचाल करणे शक्य होत नव्हते. पण या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांनी हा प्रसंग पहिला अन् त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

दिला माणुसकीचा संदेश - आठ वर्षीय मुलीला जास्त मार लागला होता. तिच्या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. समीर यांनी जणू काही आपल्या कुटुंबातील सदस्य असती तर काय केले असते, तेच केले. त्यांनी अपघातग्रस्त चिमुकलीला क्षणार्थात स्वतच्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्यांच्या मदतीला राम नवले हे रिक्षाचालकही धावून आले. त्यामुळे चिमुरडी वेळेत उपचार घेऊ शकली. चिमुकलीचे आई बाबा आणि बहीण यांनाही गंभीर दुखापत झाली होती, परंतु ते कसेबसे रुग्णालयात दाखल झाले. समीर बागसिराज यांनी केलेल्या कामगिरीमुळे चिमुकलीचे वडील मनोज पुराणिक यांनी खूप आभार मानले. समीर बागसिराज यांनी केलेल्या या मदतीने खरा तो एकचि धर्म चा संदेश गेला आहे. कितीही राजकारणातील मंडळींनी जातीजातीत तेढ किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी अश्या या राम रहीमच्या घटनांनी एक चांगला संदेश जात असून राजकीय मंडळींना त्यांच्या राजकीय भाषेत एका प्रकारे चपराकच म्हणावे लागेल.

हेही वाचा -धुळे पोलिसांची मोठी कारवाई; एसयूव्हीमधून जप्त केल्या 90 तलवारी, 4 जणांना अटक

Last Updated : Apr 28, 2022, 2:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details