मुंबई -गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानांवर संगणक परिचालक आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. मात्र, सोमवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 7 हजार महिला संगणक परिचालकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानाच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक महिला आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा हेही वाचा -'मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या संशयानंतरच हत्येचा गुन्हा दाखल'
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न-
राज्यातील संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीवरून राज्यभरातील 28 हजार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालक गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सरकार गंभीर दिसत नसल्यामुळे सोमवारी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला संगणक परिचालकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एकत्र आल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर महिला संगणक परिचालकांना प्रवेश दिला नाही. त्यामुळे शेकडो महिला आंदोलकांनी आझाद मैदानाच्या गेट समोर बसून आंदोलन करत होते. त्यामुळे पोलिसांनी या सर्व महिला आंदोलकांना अटक केली आहे. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे संगणक परिचालक संघटनेचे आंदोलनाला पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संगणक परिचालक संघटनेचे शिरूर कासरचे तालुका उपाध्यक्ष संजय आघाव यांनी केला आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र अर्थसंकल्प : मराठवाड्यातील उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा
त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला होता शब्द-
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून गेल्या 10 वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेकडून केली होती. या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. त्यावर शासनाकडून सकारात्मक आश्वासनसुद्धा देण्यात आले होते. 29 सप्टेंबर 2018 ला सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असताना संगणक परिचालक यांचा आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांना भेट दिली होती. त्यांनी शब्द दिलेला होता की संगणक परिचारकांच्या मागण्या पूर्ण करू, मात्र आज स्वतः मुख्यमंत्री असतानासुद्धा दिलेला शब्द आतापर्यंत पाळला गेला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
हेही वाचा -महा अर्थसंकल्प २०२१ : व्यापाऱ्यांवर कोणतेही नवे कर लादू नयेत - फत्तेचंद रांका
आंदोलन सुरुच राहणार-
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव झाला होता. मात्र, आता यांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पुढील निवेदन देऊनही स्वतः मुख्यमंत्री होऊन एक वर्ष झाले तरी या प्रश्नाला साधी बैठकसुद्धा घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील 28 हजार संगणक परिचालक यांनी आंदोलन सुरू केले आहे. जेव्हा पर्यंत संगणक परिचालक संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही, तेव्हापर्यंत मुंबईत संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.