महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 16, 2019, 11:28 PM IST

ETV Bharat / city

मुंबईत ६७२ कोटी खर्च करून शीव रुग्णालयाच्या तीन नवीन इमारती बांधणार

शीव रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. परिचारिका महाविद्यालय, अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान इमारत तसेच निवासी डॉक्टरांसाठीच्या इमारतींचा यामध्ये समावेश असणार आहे.

शीव रुग्णालय, मुंबई

मुंबई - शीव रुग्णालय आवाराच्या बराकमधील जुन्या कर्मचारी निवासस्थानांच्या इमारती पाडून त्याठिकाणी सेवा निवासस्थान व पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत बांधली जाणार आहे. तांत्रिक उणिवा असल्याने सोमवारी हा प्रस्ताव स्थायी समितीने परत पाठवला. मंगळवारी हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. इमारतींच्या बांधकामासाठी ६७२.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. परिचारिका महाविद्यालय, अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान इमारत तसेच निवासी डॉक्टरांसाठीच्या इमारतींचा यामध्ये समावेश असणार आहे. यासाठी कार्पोरेट क्षेत्रातील अग्रगण्य बांधकाम व्यावसायिक असलेल्या अहलुवालिया कॅान्ट्रक्ट (इंडिया) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६७२.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

हेही वाचा- नाभिक समाजासाठी महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाची स्थापना; मंत्री डॉ. संजय कुटेंची घोषणा

वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या मागील बाजुस तळ अधिक २० मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकार्‍यांसाठी निवासस्थान, रुग्णालयाच्या अखत्यारित बराक प्लॉटवर तळ अधिक १९ मजल्याची महापालिकेच्या उपयोगाकरता व कर्मचारी निवास्थानाची इमारत तसेच याच ठिकाणी तळ अधिक २५ मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, याशिवाय तळ अधिक ३ मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे.

हेही वाचा- लालबागच्या बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव; भाविकांचा मोठा प्रतिसाद

या बांधकामांसाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अ‍ॅण्ड असोशिएटस आदींनी बनवलेल्या आराखड्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. त्यामध्ये दोन निविदाकारांनी भाग घेतला. यामध्ये अंदाजित खर्चापेक्षा १४ टक्के अधिक बोली लावणार्‍या अहलुवालिया कॉन्ट्क्ट इंडिया लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. दरम्यान या प्रस्तावात काही तांत्रिक उणिवा असल्याने स्थायी समितीने हा प्रस्ताव परत पाठवला. आता मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीत पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

हेही वाचा- घाटकोपर पूर्व विधानसभा आढवा: भाजप गड राखणार का ?

ABOUT THE AUTHOR

...view details