मुंबई -महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून आज 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ( Ram Ganesh Gadkar Sugar factory ) मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्राने दिली ( Prajakt Tanpur property seized by ED ) आहे. नागपूरमधली कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ईडीने राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधील 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने ( Takshshila securities property ) खरेदी केली होती. तीही मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन ( Prajakt Tanpure property in Nagpur ) आहे. तर अहमदनगरमधील 4 एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. शिवाय प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या आहेत. त्या जागेची किम्मत जवळपास 13 कोटी 41 लाख इतकी आहे. एकूण 13 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे
हेही वाचा-Raju Shetty About ED Inquiry : एकमेकांचे हिशोब चुकते करण्यासाठी ईडीचा उपयोग - राजू शेट्टी
तनपुरे यांची ईडीकडून 9 तास चौकशी
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यावेळी तनपुरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. प्राजक्त तनपुरे म्हणाले, की ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. तसेच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असेही तनपुरे म्हणाले होते. दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले होते.
हेही वाचा-Nawab Malik Arrested : भाजपाच्या दवाबाखाली ईडीचा विनाकारण त्रास; नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक आरोप
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा ईडीने तपासासाठी घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अनेक कारखान्यांना कर्ज दिले आहे. त्या सहकारी साखर कारखान्यांनी ते कर्ज फेडले नाही. त्यामुळे बँकेने ते कारखाने जप्त केले आहेत. हे जप्त केलेले कारखाने बँकेवर संचालक असलेल्या लोकांच्या नातेवाईकांनीच कवडीमोल भावात विकत घेतले. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.
हेही वाचा-ED Summons Malik Son : नवाब मलिक यांच्या मुलाला ईडीकडून समन्स; आज होणार चौकशी
दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना नुकतेच ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.