मुंबई - महाराष्ट्र पोलीस खात्यातील ज्येष्ठ आयपीएस अधिकार्यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे. यामध्ये के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई व बी. बी. फणसळकर या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती देण्यात आलेली आहे.
राज्यातील तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती - संदीप बिष्णोई
ज्येष्ठ आयपीएस अधिकार्यांची पदोन्नती करण्यात आलेली आहे. यामध्ये के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई व बी. बी. फणसळकर या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती देण्यात आलेली आहे.
1988च्या बॅचचे असलेले के वेंकटेशम हे सध्या अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती अभियान महाराष्ट्र राज्य या ठिकाणी कार्यरत होते. त्यांना महासंचालकपदी बढती देण्यात आलेली असून नागरी संरक्षण, मुंबई येथे पाठवण्यात आलेले आहे. तसेच 1989च्या बॅचचे असलेले आयपीएस अधिकारी संदीप बिष्णोई यांची सध्याची नेमणूक ही अपर पोलीस महासंचालक लोहमार्ग मुंबई येथे करण्यात आलेली होती. त्यांना महासंचालकपदी बढती देण्यात आलेली असून न्यायिक व तांत्रिक विभागात महासंचालकपदी त्यांना पाठवण्यात आलेला आहे. 1989 बॅचचे असलेले बी. बी. फणसळकर हे सध्या ठाणे पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना त्यांना महासंचालकपदी बढती देऊन व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ वर पाठवण्यात आलेले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले बी. बी. फणसळकर यांना महासंचालकपदी बढती देण्यात आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सुरेश कुमार मेखला यांच्याकडे देण्यात आलेला आहे.