मुंबई - महापालिकेच्या केईएम रुग्णालयात बालरोग विभागात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रिन्स हा तीन महिन्याचा चिमुकला भाजला गेला. त्यानंतर पुढील उपचार करताना डॉक्टरांना प्रिन्सचा डावा हात कापावा लागला. या घटनेनंतर पीडित प्रिन्सचे वडील पन्नेलाल राजभर यांनी या संदर्भात मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक .. 'केईएम'मध्ये आग; उपाचारासाठी दाखल 'प्रिन्स'चा कापावा लागला हात, गुन्हा दाखल पालिकेच्या केईएम रुग्णालयात बालरोग विभागात असणाऱ्या मशीनच्या वायरमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून बेडवर ठेवलेल्या कागदाच्या गठ्ठ्याला आग लागली. या घटनेनंतर उपचार घेत असलेल्या प्रिन्स या बाळाच्या हाताला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
मुंबईत मुलाच्या उपचारासाठी राजभर हे ६ नोव्हेंबरला केईएम रुग्णालयात आले होते. ७ नोव्हेंबरला दोन अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या उपचार सुरू असलेल्या बेडवर अचानक शार्टसर्किटमुळे आग लागली. त्यात प्रिन्सचा हात जळाला. प्लास्टिक सर्जरी करून त्याचा हात नीट होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, चार दिवसानंतर हाडांचे डॉक्टर आले आणि त्यांनी मुलाचे ऑपरेशन करावे लागेल, असे सांगितले. त्यांनी प्रिन्सच्या वडिलांच्या सह्या घेऊन ऑपरेशन केले.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रिन्सला अंपगत्व आले असल्याने, प्रशासनाला दोषी ठरवत राजभर यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.