महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ - कृषीमंत्री दादा भुसे

पीक विम्याचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती. मात्र आाता केंद्र सरकारने पीक विमा योजनेचे अर्ज भरण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आता ऊर्वरित शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.

कृषीमंत्री दादा भुसे
कृषीमंत्री दादा भुसे

By

Published : Jul 16, 2021, 7:21 PM IST

मुंबई - राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार केंद्र सरकारने पीक विमा योजनेचे अर्ज भरण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे आता ऊर्वरित शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे.

पीक विम्याचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली होती. केंद्र सरकारने याची दखल आता ही मुदत 23 जुलैपर्यंत वाढवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details