मुंबई - ठाकरे सरकारमधील अनिल परब, अनिल देशमुख नंतर तिसरे कॅबिनेट मंत्री असलेल्या अनिलचे घोटाळे पुराव्यासाहित मी पुढच्या आठडवड्यात जाहीर करेन, अशी घोषणा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली होती. त्यासंदर्भात आज ते पत्रकार परिषद घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. तसेच मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काय म्हणाले किरीट सोमैया -
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमैया यांनी केला. तसेच मुश्रीफ यांचा मनी लाँडरिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचेही ते म्हणाले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. या सर्व घोट्याळ्याची कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असून त्यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमैय्या यांनी केसी आहे.