मुंबई -मुंबईतील मुलुंड परिसरामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. महानगरपालिकेचे डॉक्टर जागेवर उपलब्ध नसल्याने एका आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपले प्राण गमवावे लागल आहे. निशा कसबे असं या महिलेचं नाव आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे.
ही घटना मुलुंडच्या पाच रस्ता परिसरात असलेल्या पालिका रुग्णालयलायत घडली आहे.
पालिका अधिकाऱ्यांचा भेट देण्यास नकार
आठ महिन्याच्या गरोदर महिलेला येथील पालिकेच्या रुग्णालयात काल दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र, काल मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली. मात्र, तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. याबाबत उशिरा नातेवाईकांना माहिती मिळाली. त्यानंतर महिलेला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रसूतिगृहमध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे निशा आणि तिच्या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. दरम्यान, यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेट देण्यास नकार दिला.