महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Marathi schools: बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू करण्यासाठी सरकार काय करणार- प्रविण दरेकर - मराठी राजभाषा

एका बाजूला सरकार मराठी राजभाषासाठी कायदा करीत असताना दुसरीकडे मराठी शाळांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे ज्या मराठी शाळा बंद पडल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्यासाठी व मराठी शाळा बंद पडू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Mar 24, 2022, 10:33 PM IST

मुंबई- महापालिकेत शिवसेनेची सत्ता ( Power of Shivsena in BMC ) आहे, पण दुदैवाने गेल्या १० वर्षाच्या काळात मराठी शाळा मोठया प्रमाणात बंद पडल्या आहेत. तर या मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे, याकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी ( Pravin Darekar on government Marathi schools ) राज्य सरकारचे लक्ष वेधले.

एका बाजूला सरकार मराठी राजभाषासाठी कायदा करीत असताना दुसरीकडे मराठी शाळांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे ज्या मराठी शाळा बंद पडल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्यासाठी व मराठी शाळा बंद पडू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर ( opposition leader Pravin Darekar ) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( Budget Session 2022 ) उपस्थित केला.

Pravin Darekar on government Marathi schools in Budget session 2022

हेही वाचा-Pune Rape Accused Sketch : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी..

आजपर्यंत मराठीचे भावनिक राजकारण
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. प्रवीण दरेकर म्हणाले, की मराठी भवन उभारणी, मराठी भाषा संवर्धन, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य या फक्त घोषणाच राहिल्या आहेत. मराठी भाषेसाठी सरकार कायदा करीत असताना मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नावे मुंबई पब्लिक स्कूल आहे. ते सुद्धा बदलण्याची गरज आहे, असेही दरेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा-Amruta Fadnavis Criticized MVA : 'मै खाऊंगा भी, और खानेवाले की सुरक्षा भी करुंगा' असे राजकारण महाराष्ट्रात सुरू : अमृता फडणवीस

मराठीत शिकल्याने महापालिकेकडून नोकरी नाही-

आजपर्यंत मराठीचे भावनिक राजकारण करून शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु निवडणुकीपुरते मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी मुंबईतल्या मराठी शाळाच हद्दपार केल्या आहेत. पात्र उमेदवारांना शिक्षक पदासाठी ९ ऑगस्ट २०१९ शिफारसपत्रे दिली. यापैकी १५० उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने त्यांना महापालिकेने नोकरी दिली नाही. या मराठी तरुणांनी तुमच्या वचनाची आठवण करुन देण्यासाठी शंभर दिवस आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल घ्यायलासुध्दा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही.

हेही वाचा-MH Assembly Budget Session : मुंबईत आमदारांसाठी होणार गृहप्रकल्प, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

१५० शिक्षकांना मुंबई महापालिकेच्या शाळेत तात्काळ सामावून घ्यावे-
१५० शिक्षकांनी मराठीतून शिक्षण घेतले आहे. त्यांना मुंबई महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ मराठी शिक्षण घेणाऱ्या या १५० शिक्षकांना मुंबई महापालिकेच्या शाळेत तात्काळ सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही प्रविण दरेकर यांनी यावेळी केली. असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

मराठी माध्यमाची स्थिती खराब
हिंदी माध्यमाची पटसंख्या मराठीपेक्षा दुप्पट आहे. उर्दू माध्यमाची पटसंख्यादेखील मराठीपेक्षा दुप्पट आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सभागृहात आकडेवारीदेखील सादर केली. माध्यम हिंदी (शाळांची संख्या २२७, पटसंख्या ६३२०२), माध्यम उर्दू (शाळांची संख्या १९३, पटसंख्या ६२५१६), माध्यम मराठी (शाळांची संख्या २८०,पटसंख्या ३३११४). दरेकर यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना पालिका सेवेत घेण्यात यावे अशी मागणी केली.


मराठी शाळांची स्थिती
वर्ष शाळा विद्यार्थी
२०१०-११ ४१३ १,०२,२१४
२०११-१२ ३९६ ९२३३५
२०१२-१३ ३८५ ८१११६
२०१३-१४ ३७५ ६९३३०
२०१४-१५ ३६८ ६३३३५
२०१५-१६ ३५० ५८६३७
२०१६-१७ ३२८ ४७९४०
२०१७-१८ ३१४ ४२५३५
२०१८-१९ २८७ ३६५१७
२०१९-२० २८३ ३५१८१
२०२०-२१ २८० ३३११४

ABOUT THE AUTHOR

...view details