महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई: महापालिका बंगल्याच्या वादामुळेच प्रवीण दराडे यांची पालिकेतून बदली? - पल्लवी दराडे

मुंबई महापालिकेचा मलबार हिल येथे जल अभियंता विभागाचे दोन बंगले आहेत. त्यापैकी एका बंगल्यात महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या पल्लवी दराडे आपले पती प्रवीण दराडे यांच्यसह राहत होत्या. त्यावेळी प्रवीण दराडे हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते. याच कार्यकाळात मुंबईच्या महापौरांचा शिवाजी पार्क येथील बंगला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यासाठी मागणी पुढे आली. स्मारक बनवण्यासाठी महापौरांना आपला बंगला खाली करावा लागणार होता. त्यासाठी महापौरांना पर्यायी बंगला म्हणून मलबार हिल येथील दराडे कुटूंबीय राहत असलेला बंगला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. पल्लवी दराडे यांचीही पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली झाल्याने हा बंगला पालिकेने ताब्यात घेऊन त्याठिकाणी महापौर निवास बनवण्याची मागणी करण्यात येत होती.

जल अभियंता विभागाचा बंगला
जल अभियंता विभागाचा बंगला

By

Published : Jan 17, 2020, 3:32 AM IST

मुंबई - भाजपा सरकारच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर प्रवीण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर असताना पालिकेच्या जल अभियंत्याच्या बंगला त्यांना राहण्यास देण्यात आला होता. हा बंगला महापौरांना देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र, हा बंगला दराडे कुटूंबियांनी खाली करण्यास नकार दिला होता. त्यामुळे राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होताच प्रवीण दराडे यांची बदली करण्यात आली आहे. यामुळे याबादलीला हा बांगलाच कारणीभूत असल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात आहे.

'बंगला'वाद

मुंबई महापालिकेचा मलबार हिल येथे जल अभियंता विभागाचे दोन बंगले आहेत. त्यापैकी एका बंगल्यात महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेल्या पल्लवी दराडे आपले पती प्रवीण दराडे यांच्यसह राहत होत्या. त्यावेळी प्रवीण दराडे हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते. याच कार्यकाळात मुंबईच्या महापौरांचा शिवाजी पार्क येथील बंगला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्यासाठी मागणी पुढे आली. स्मारक बनवण्यासाठी महापौरांना आपला बंगला खाली करावा लागणार होता. त्यासाठी महापौरांना पर्यायी बंगला म्हणून मलबार हिल येथील दराडे कुटूंबीय राहत असलेला बंगला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. पल्लवी दराडे यांचीही पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून बदली झाल्याने हा बंगला पालिकेने ताब्यात घेऊन त्याठिकाणी महापौर निवास बनवण्याची मागणी करण्यात येत होती.

प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे
जल अभियंत्यांच्या बंगल्यात राहणारे दराडे कुटूंबियांना अनेक वेळा नोटीस देऊनही बंगला खाली करण्यात आलेला नाही. महापौर निवासाचा विषय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला आणावा, अशी मागणी करण्यात आली होती. मलबार हिल येथील बंगल्यामधून दराडे यांना बाहेर काढू नये, असे स्पष्ट पत्र पालिका आयुक्तांना सामान्य प्रशासनाकडून ऑक्टोबर २०१७ मध्ये पाठवण्यात आले आहे. दराडे हे पालिकेच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे. ते या सेवेत असे पर्यंत त्यांच्याकडून बंगला काढू नये, तसेच बंगल्याच्या भाड्यासाठी दुप्पट रक्कम आकारू नये, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले होते. याबाबत ३१ डिसेंबर २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी, तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय जल अभियंत्यांचा बंगला खाली करण्यासाठी नोटीस देऊ नये, असे निर्देश पालिकेला देण्यात आले होते.
प्रवीण दराडे
तत्कालीन सरकारने दराडे कुटूंबियांना बंगल्यातून काढू नये, असे निर्देश दिल्याने पालिकेला दरडे यांच्या विरोधात कारवाई करता आली नाही, मात्र राज्यात भाजपचे सरकार जाऊन आता शिवसेना काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. पल्लवी दराडे या अन्न व औषधे प्रशासनात नियुक्तीवर आहेत. तर प्रवीण दराडे यांची बदली पुण्याला करण्यात आली आहे. बंगल्यापासून दूर करून त्यांच्या ताब्यातील बंगला पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठीच बदली करण्यात आल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात आहे. दरम्यान, बदली नंतरही आता दराडे कुटूंबीय पालिकेचा बंगला खाली करणार का हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.दराडे यांच्याकडे होती महत्वाची जबाबदारी -दराडे हे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्त झाल्यावर त्यांच्याकडे मुंबईमधील महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी होती. त्यात कोस्टल रोड, गारगाई पिंजाळ यासारख्या पाणी प्रकल्पाची जबादारी होती. तसेच पालिकेतील इतर प्रकल्पांचा प्रकल्पांची जबादारी त्यांच्याकडे होती. महापालिका आणि मुंबईकरांसाठी महत्वाचे प्रकल्प त्यांच्याकडे असतानाच त्यांची बदली झाल्याने त्याकडे आश्चर्याने पाहिले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details