मुंबई : विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बँक फसवणूक प्रकरणात ( Praveen Darekar Mumbai Bank fraud case ) रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये ( Ramabai Ambedkar Police Station Mumbai ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले असून, आज दरेकर यांची पुन्हा चौकशी होणार आहे. दरेकर आज माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्टेशनमध्ये हजर राहणार आहेत.
पोलिसांकडून नोटीस :मुंबई पोलिसांनी दरेकर यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. प्रवीण दरेकर यांची यापूर्वीदेखील दोन वेळा चौकशी करण्यात आली ( Pravin Darekar Enquiry ) होती. आज जवळपास 11 च्या सुमारास दरेकर एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
असे आहे प्रकरण- आम आदमी पक्षाच्यावतीने धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक संचालक पदाची निवडणूक लढवली. त्या माध्यमातून दरेकर यांनी मुंबै बँकेचे ठेवीदार प्रशासन आणि सरकार यांची 20 वर्षे फसवणूक केली असा आरोप दरेकर यांच्यावर आहे. प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून 1997 पासून मुंबै बँकेवर निवडून येत आहेत. दरेकर हे नागरी सरकार बँक आणि मजू अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. त्याची मुंबै बँकेवर संचालक म्हणूनही बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर यांना अपात्र ठरवले आहे. प्रवीण दरेकर यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. प्रविण दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिला होता. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता. या जामीन अर्जावर 29 मार्च रोजी हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी पार पडू शकली नाही. त्यामुळे दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवण्याची मागणी केली होती.
हेही वाचा : AAP on Pravin Darekar : दरोडेखोर प्रवीण दरेकरांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवा, आपची मागणी