मुंबई -नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन ( Nitesh Rane Bail Rejected ) अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ( Prasad Lad Tweet On Nitest Rane Bail Rejaction ) याबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयातील जाणार आहोत, असे ट्वीट प्रसाद लाड यांनी केले.
'राणे कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय' -
संतोष परब मारहाण प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी नितेश राणे यांच्याकडून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर काल व आज असे दोन दिवस सुनावणी झाली. आज सत्र न्यायालयाने नितेश राणे यांची जामीन अर्जाची विनंती फेटाळून लावल्यानंतर आता यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांना जामीन मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून ज्या पद्धतीने यंत्रणा लावण्यात आली होती. ते पाहता त्यांना आत अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे सांगितले आहे. त्याच बरोबर न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही सांगितले आहे.
सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामीन -