मुंबई - हिंदूंचा नववर्षाचा मुख्य सण गुढीपाडवा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना व त्याबरोबरच रामनवमी हा उत्सव साजरा केला जाणार असताना त्यावर सरकारने बंदी घातली ( Gudhipadwa Ramnamavi Restrictions By Government ) आहे. या बंदीचा निषेध म्हणून भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी आज सरकारच्या निषेधार्थ मुंडण केले ( Prasad Lad Criticized Uddhav Thackeray ) आहे.
Prasad Lad : उद्धव ठाकरे आदिलशहा सरकारचं दर्शन देत आहेत का? प्रसाद लाड यांचा सवाल, मुंडन करून निषेध - रामनवमी गुढीपाडवा निर्बंध राज्य सरकार
हिंदूंच्या सणांवर बंदी घालत असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंडन करून राज्य सरकारचा निषेध केला ( Prasad Lad Criticized Uddhav Thackeray ) आहे. जमावबंदीचा आदेश काढल्याने त्यांनी हा निषेध केला असल्याचे म्हटले ( Gudhipadwa Ramnamavi Restrictions By Government ) आहे.
काय म्हणाले प्रसाद लाड? : ज्या प्रकारे सरकारने गुढीपाडव्याच्या उत्सवाला जमावबंदीचे आदेश दिले. त्याचा मी निषेध करतो. मराठी व हिंदू सणांच्या उत्सवाला अशा पद्धतीची बंदी घालून उद्धव ठाकरे आदिलशहा सरकारचं दर्शन देत आहेत का? असा आम्हाला, हिंदूंना वाटायला लागले आहे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या मांडीवर बसून मराठ्यांची व हिंदूंची चेष्टा करतील असा आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. याचा निषेध म्हणून हिंदूंच्या सणावर बंदी घातली यासाठी मी माझ मुंडण करून या सरकारचा निषेध करत आहे.