मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Nationalist Congress Party ) सर्व राष्ट्रीय विभागाची आणि सेलची बरखास्ती ( NCP departments and cells dismissed ) करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. प्रफुल पटेल यांच्या सहीचे असलेल्या या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व राष्ट्रीय पातळीवरची विभाग आणि सेल तातडीने बरखास्त करण्याचा निर्णय कळवण्यात आला असल्याचे पात्रातून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण ( Confusion among NCP officials ) झाला होता. तसेच राजकीय वर्तुळात देखील उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र बरखास्त केलेल्या सेल आणि विभागांचा राज्यातील सेल आणि विभागाशी कोणताही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केल आहे.
फक्त राष्ट्रीय पाठीवरचे असेल आणि विभागाच्या नियुक्त्या रद्द - हे पत्र सर्व सेल आणि विभाग प्रमुख देण्यात आल्याचा उल्लेखही या पत्रात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आपल्या पहिल्या पत्रामध्ये म्हटले आहे. मात्र ही बरखास्ती ( Dissolution of National Division and Cell )केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यात घडत असलेल्या सत्ता नात्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जातंय. राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस यूथ ( Nationalist Congress Party Youth ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी परिषदेची तातडीने बरखास्त करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय राज्यासाठी लागू होणार नाही असे स्पष्ट संकेत जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल यांनी दिले आहेत. त्यामुळे या घेतलेल्या तातडीच्या निर्णयाचा राज्यातील राजकारणाशी कोणताही संबंध नाही. देश पातळीवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींनी असा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले आहेत.