महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Powerful CMs of Maharashtra : महाराष्ट्रातील शक्तिशाली मुख्यमंत्री आणि त्यांचे निर्णय

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री ( Eknath Shinde is 29th Chief Minister of Maharashtra) आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या 63 वर्षांच्या वाटचालीत ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली, आणि ती पुढे नेली. अशा पाच महत्त्वाच्या आणि प्रभावशाली मुख्यमंत्र्यांचा ( important and influential CM ) कार्यकाळ आणि त्यांची कामे जाणून घेऊयात .

mantralay
मंत्रालय

By

Published : Jul 1, 2022, 5:32 PM IST

मुंबई -महाराष्ट्राने एकनाथ शिंदे यांच्या रूपाने 29 वे मुख्यमंत्री राज्याला दिले आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या 63 वर्षांच्या वाटचालीत ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली,आणि ती पुढे नेली. अशा पाच महत्त्वाच्या आणि प्रभावशाली मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ आणि त्यांची कामे जाणून घेऊया. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ( maharashtra chief minister eknath shinde ) यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी नुकतीच शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली असून नवनवीन प्रकल्प आणि युतीच्या काळात अपुऱ्या राहिलेल्या प्रकल्पांची पूर्तता यावेळी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नव्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. मात्र आतापर्यंत राज्याच्या इतिहासात प्रभावशाली राहिलेल्या पाच मोठ्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ आणि त्यांची कार्य जाणून घेऊया.

यशवंतराव चव्हाण - १ मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 :राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan first Chief Minister Maharashtra ) यांच्याकडे पाहिले जाते. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची उभारणी करत संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यानंतर देशाचे माजी संरक्षण मंत्री द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान अशा विविध पदांवर यशवंतरावांनी कार्य केले. यशवंतरावांनी आपल्या दूरदृष्टीने महाराष्ट्रात पंचायत राज योजना आणली. जमीन, पाटबंधारे व उद्योग विकासासाठी अपाय योजना केल्या. मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा आणि राज्याच्या विकासासाठी अनेक योजना सुरू ( Launched several schemes for state ) केल्या. यशवंतरावांनी राज्यात 18 सहकारी साखर कारखाने सुरू केले. कोयना जलविद्युत प्रकल्प आणि महाराष्ट्राच्या पंचवार्षिक योजनांचा तसेच पानशेत धरणाच्या बांधणीचा प्रारंभही यशवंतरावांच्या काळातच झाला. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या विकासाची रोवलेली मुहूर्तमेढ महाराष्ट्रासाठी खूपच फलदायी ठरली.

वसंतराव नाईक - ५ डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 :वसंतराव नाईक ( Vasantrao Naik ) यांना सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपद ( Chief Minister three times in a row ) भूषवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मान आहे. विशेष म्हणजे या तिन्ही टर्ममध्ये कोणताही खंड पडला नाही. वसंतराव नाईक यांच्या कालखंडात महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार हमी योजना, गरिबी हटाव योजना, हरितक्रांती, धवल क्रांती, लॉटरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गाय आणि म्हैस यांच्या दुधाला एकच भाव असे महत्त्वाचे निर्णय झाले. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र धान्य आणि दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.

शरद पवार - 18 जुलै 1978 ते 16 फेब्रुवारी 1980, 25 जून 1988 ते 3 मार्च 1990, 6 मार्च 1993 ते 13 मार्च 1995 :शरद पवार ( Sharad Pawar ) हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं सध्याचं मोठं नाव. शरद पवारांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या विविध कालखंडात अनेक महत्त्वाचे आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांनी महिलांविषयी धोरण राबवलं. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणले. उसाच्या गळीत हंगामाच्या काळाची निश्चिती केली. सर्व महाविद्यालयांना समान शैक्षणिक शुल्क असावे हा निर्णय घेतला. कृषी संशोधनासाठी सरकारतर्फे मदत करण्यात आली. सहकार आणि औद्योगिक विकासासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात आले. पवारांनी लातूरच्या भूकंप पुनर्वसनाची जबाबदारी समर्थपणे पेली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्यात आले. लघु उद्योगांना सवलती देण्यात आल्या. तेलबिया अन्नधान्य आणि ऊस उत्पादन वाढीसाठी खास प्रकल्प योजना राबविण्यात आल्या. हादरलेल्या मुंबईच पुनर्वसन पवारांच्या काळात झाले.

मनोहर जोशी - 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 :डॉक्टर मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मनोहर जोशी यांच्या कालावधीत राज्याचे नवे शैक्षणिक धोरण आखण्यात आले. महाराष्ट्र टँकर मुक्त करण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चा महत्वकांक्षी प्रकल्प जोशी यांच्या काळात पार पडला. तर, मुंबईत 55 उड्डाणपूल ही याच काळात उभे करण्यात आले. राज्यात एक रुपयात झुणका भाकर या प्रकल्पाची अंमलबजावणी जोशी यांच्या कालावधीत झाली. बळीराजा संरक्षण योजना, पाटबंधारे, रस्ते विकास, कृष्णा खोरे आणि वीज निर्मिती असे अनेक प्रकल्प या काळात राबविण्यात आले.

देवेंद्र फडणवीस - ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ :देवेंद्र फडणवीस हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि चाणाक्ष नेते आहेत. त्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग मेट्रो प्रकल्प जलयुक्त शिवार योजना या गोष्टी करण्यात आल्या. सरपंचांची निवड थेट जनतेतून घेण्याचा निर्णयही या सरकारने घेतला. महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. जलसंधारणासाठी विविध योजना राबवण्यात आल्या. विधानसभेत लोकसेवा हक्क कायदा मंजूर करण्यात आला. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं तर इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करून, त्याची निर्मिती करण्याचा निर्णय फडणवीस यांच्या काळात घेण्यात आला. या पाच महत्त्वाच्या आणि प्रभावशाली मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव आणि छाप सोडली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -Thackeray On Mumbai : माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, उद्धव ठाकरेंचे नव्या सरकारला आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details