मुंबई -टाटा वीज कंपनीच्या कळवा येथील ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने आज सकाळी मुंबईमधील बत्ती गुल झाली होती. याचा परिणाम मुंबईकरांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम - मुंबई वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. या अनुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तरी या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.
मुंबईत बेस्ट, अडाणी आणि एमएसईबी या वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. या वीज कंपन्या मुंबईत वीज पुरवठा करत असल्या तरी त्या टाटा कंपनीकडून वीज विकत घेतात. आज सकाळी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कळवा येथील ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने मुंबईचा वीज पुरवठा बंद झाला. यामुळे महानगरपालिकेच्या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा परिणाम झाला. ज्यामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊन, काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. या अनुषंगाने आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने उद्या दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तरी या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.
मुंबईकरांना आज योग्य प्रमाणात पाणी मिळाले नसल्याने नागरिकांचे हाल झाले. काही विभागात इमारतींच्या परिसरात पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमधील पाणी इमारतीत चढविण्यासाठी विजेची गरज भासते. वीज नसल्याने अनेक इमारतींमध्ये पाणी नसल्याने त्यात राहणाऱ्या रहिवाशांचे हाल झाले. पालिकेकडून उद्या पाणीपुरवठा केला जाणार असल्याने लाखो नागरिकांना पाण्यासाठी उद्याची वाट बघावी लागणार आहे.