पुणे/मुंबई- वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn project ) गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीकेची ( Eknath Shinde Govt ) जोड उठवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात जोरदार निर्देशने केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Nationalist Congress MP Supriya Sule ) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संर्दभात ट्विट केले असून त्यात लिहले आहे की, वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
विरोधक आक्रमक - वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत आज शिवसेनेतर्फे सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तसेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार निर्देशने ( Agitation against Shinde-Fadnavis government ) करण्यात आले आहे.