महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 25, 2022, 7:29 PM IST

Updated : Apr 25, 2022, 7:57 PM IST

ETV Bharat / city

Mosque Loudspeaker Contraversy : राजकीय पक्षांना राज्यात अशांतता हवी आहे का? सर्वपक्षीय बैठकीनंतर जाणकारांचा सवाल

राज्यात भोगे ( Maharashtra Mosque Loudspeaker Contraversy ) लावण्यावरून सुरू असलेल्या राजकीय आणि धार्मिक गदारोळानंतर आता यावर राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक ( All Party Meeting On Mosque Loudspeaker ) सरकारतर्फे घेण्यात आली. मात्र, या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह जबाबदार विरोधी पक्षनेते ही हजर राहिले नाहीत. त्यामुळे खरंच विरोधीपक्ष राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण होतो, असं मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

All Party Meeting On Mosque Loudspeaker
All Party Meeting On Mosque Loudspeaker

मुंबई -मशिदीवरील भोंगे उतरवावे, असे आवाहन राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी कार्यकर्त्यांना केल्यानंतर राज्यात हनुमान चालीसा पठनाचे ( Hanuman Chalisa Contraversy ) पेव फुटले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने याबाबत ठाम भूमिका घेत भोंगे लावण्याबाबत मार्गदर्शिका ( Guideline For Mosque Loudspeaker ) प्रसिद्ध केली. मात्र, राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन ( All Party Meeting On Mosque Loudspeaker ) करण्यात आले. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी आणि राज ठाकरे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीला मनसेच्यावतीने नितीन सरदेसाई ( Nitin Sardesai ) उपस्थित होते. तर भाजपाच्यावतीने कोणीही उपस्थित राहिले नाही. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ही प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले नाहीत.

प्रतिक्रिया

'विरोधकांना शांतता हवी आहे का?' -राज्य सरकारने आज बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः हजर राहिले नाही. त्यामुळे या बैठकीचं गांभीर्य आधीच कमी झाले. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि राज ठाकरे हे स्वतः हजर राहिले नाही. त्यामुळे या मुख्य विरोधकांना राज्यात शांतता हवी आहे का? राज्य स्थिर करायचे आहे? हा खरा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण होतो. प्रत्येकाला आपले राजकीय गोल सेट करायचे आहेत. त्यामुळे शक्य असूनही भाजपाने या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. राज्य अस्थिर करून लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट कशी लावता येईल, याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावरून दिसून येते, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.

'बैठक घेतली कशासाठी?' -वास्तविक राज्य सरकारने भोगयाबाबत आपली नियमावली आधीच जाहीर केली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची आणि भोंगयांबाबतची नियमावली तयार करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे अशी बैठक घेण्याची खरंच गरज होती का? असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे. या बैठकीत मनसेने आपली भूमिका मांडली आहे. मात्र, भाजपने आपली भूमिका मांडली नाही. या बैठकीकडे पाठ फिरवून भाजपने आपल्या मनात नेमके काय आहे? हेच दाखवून दिले आहे, असेही जोशी यावेळी म्हणाले.

'बेजबाबदार विरोधी पक्ष' -राज्य सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भारतीय जनता पक्षाने गैरहजेरी लावली. राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था नांदावी, यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, असे असतानाही या बैठकीकडे पाठ फिरवून अत्यंत बेजबाबदार विरोधी पक्ष असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. भाजपचया कृतीचा आपण निषेध करीत असून राज्य सरकारने भोंग्यांबाबत जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे कार्यवाही करावी आणि जे नियमांचा भंग करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे मत आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी

Last Updated : Apr 25, 2022, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details