महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांनी केली अपघाती मृत्यूची नोंद - गळफास

तरुणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर भगवती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल पोलिसांना दिला होता.

मंजुनाथ सिंगे

By

Published : Apr 17, 2019, 9:34 PM IST

मुंबई- मालाडमध्ये 6 एप्रिलला 17 वर्षीय तरुणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. भगवती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल पोलिसांना दिला होता. मात्र मालाड पोलिसांनी या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलीस संशयिताला पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.

मंजुनाथ सिंगे


अल्पवयीन मुलीने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून ही आत्महत्या केल्याने मृत मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीवर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याची घटना समोर आली आहे.


मृत तरुणी मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी आहे. आपल्या आईवडिलांसोबत ती मालाड परिसरात राहत होती. रोजंदारीसाठी मालाड परिसरात ती मोलकरणीचे काम करत होती. मात्र मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या मृतदेहावर अत्याचार झल्याचे निशाण असून डॉक्टरांनी तसा अहवाल देऊनही आरोपीला पोलीस संरक्षण देत आहेत का, असा सवाल नातेवाईक उपस्थित करत आहेत.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ता मंजुनाथ सिंगे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details