ठाणे - २८ डिसेंबरच्या पहाटे ठाण्यातील कळवा परिसरांमध्ये चोरीच्या उद्देशातून एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. चोरी आणि हत्या करण्याआधी औषध दुकानाची रेकी करण्यात आली होती. ही रेकी दोन महिलांनी केली होती असा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात उघड झाला आहे. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ठाणे क्राईम गुन्हे शाखा आरोपींचा शोध घेता आहेत. ठाणे क्राईम ब्रँचने चोरी करुन हत्या करणाऱ्या तरुणाचे तसेच रेकी करणाऱ्या दोन महिलांचे सिसिटिव्ही फुटेज जारी केले आहे. या आरोपींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी, असे आव्हान देखील ठाणे पोलिसांनी केले आहे.
कळवा औषध विक्रेता हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासा, चोराने गोळ्या घालून केली होती हत्या - मुंबई गुन्हे वृत्त
२८ डिसेंबरच्या पहाटे ठाण्यातील कळवा परिसरामध्ये चोरीच्या उद्देशातून अका युवाकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत.
२८ डिसेंबरच्या पहाटे कळव्यातील मुकुंद कंपनी रोडवरील शिवाजी नगर येथे वीर युवराज मेडिकलमध्ये एक चोर चोरीच्या उद्देशाने शिरला होता. मेडिकलचे शटर तोडून चोर आत शिरला आणि त्याने मेडिकलमधील गल्ल्यातून पैसे चोरण्यास सुरूवात करताच मेडिकलच्या काऊंटर आणि सोकेशमधील पोकळीत मेडिकलचे मालक यांचा पाहुणे प्रेमसिंग उर्फ जितेंद्र सिंह राजपूत झोपले होते. ते चोराच्या आवाजाने जागे झाले. आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी प्रेम सिंह उठले तोच त्यांना तोंडाला रुमाल बांधलेला एक चोर गल्ल्यातून पैसे चोरत असताना त्यांना दिसला. त्यांनी आरडा-ओरडा करताच त्या चोराने त्याच्या जवळील पिस्तुलने दोन गोळ्या प्रेम सिंग यांच्यावर झाडल्या, त्यातील एक गोळी प्रेम सिंह यांच्या छातीवर लागली तरीही प्रेम सिंह चोराला विरोध करत होते. मात्र, गोळी थेट छातीत लागल्याने प्रेम सिंह थोड्या वेळाने जमिनीवर कोसळले. चोर चोरी करुन फरार झाला. हा सर्व प्रकार मेडिकलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. घडलेला प्रकार धक्कादायक असून कळवा पोलूस आणि ठाणे पोलीस गुन्हे शाखा या चोरट्याचा शोध घेत आहेत.