महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दातांच्या दवाखान्यात 80 लाखांची चोरी, पोलिसांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या - मशीन

डॉक्टरच्या रुग्णालयातील मशीनची चोरी करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अटक केलेली टोळी

By

Published : Jun 26, 2019, 4:02 PM IST

मुंबई- पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरातील दातांच्या डॉक्टराच्या दवाखान्यातून लाखो रुपयांच्या मशीन आणि खुर्च्यांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी फरार टोळीला सीसीटीव्हीच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी जेरबंद केले आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार


कांदिवली पश्चिम भागातून 15 जूनला डॉ. अशोक मुंडे यांच्या दवाखान्यातून अंदाजे 80 लाख रुपये किंमतीच्या मशीन चोरीला गेल्या होत्या. या घटनेची पोलीस तक्रार होताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. पोलिसांनी तीन आरोपींना दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. या घटनेत सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे फुटेज तपासले असता, डॉक्टरांकडे काम करणाऱ्या एका कामगाराचा या चोरीत हात असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या घटनेचा मास्टर माइंड जहाँगीर शेख (25), रज़िउल्लाह खान (28) हामीद नाम या आरोपींना मीरा रोड भागातून ताब्यात घेतले असून चोरी केलेले साहित्य देखील जप्त केले आहे.


कमी वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी ही चोरी केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. मशीन बाहेरच्या राज्यात विकून पैसे उकळण्याच्या तयारीत ते होते, असे झोन 11 चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details