मुंबई- फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हिरामन तिवारीचे मुंडण करणाऱ्या चार शिवसैनिकांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. वडाळा टीटी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
हिरामन तिवारी मुंडण प्रकरण; चार शिवसैनिकांना अटक - वडाळा टीटी पोलीस
शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुदगर, प्रकाश हसबे ,श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हिरामन तिवारी मुंडण प्रकरण
हेही वाचा - सेना-भाजपमध्ये वाद रंगणार?; शिवसैनिकांकडून मारहाण झालेल्या युवकाच्या भेटीला भाजप नेते
शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुदगर, प्रकाश हसबे ,श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित तिवारीला मारहाण करून त्याचे मुंडण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.