मुंबई - रस्त्याच्या बाजूस उभ्या असलेल्या महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडण्यात पार्क साईट पोलिसांना यश आले आहे. या तिघांनी विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, व पवई आदी भागातून अनेक मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले असून त्यापैकी 11 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून मोटारसायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मोटारसायकल चोरणारे त्रिकुट जेरबंद, 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश - motorcycle thieves in mumbai
रस्त्याच्या बाजूस उभ्या असलेल्या महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या त्रिकुटाला पकडण्यात पार्क साईट पोलिसांना यश आले आहे. या तिघांनी विक्रोळी, घाटकोपर, साकीनाका, व पवई आदी भागातून अनेक मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले असून त्यापैकी 11 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून मोटारसायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मोटारसायकल चोरणारे त्रिकुट जेरबंद, 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश
या मोटारसायकल चोरी प्रकरणात पार्क साईट, पंतनगर, साकीनाका व पवई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रुपेश कांबळे व विकास बनसोडे या दोघांना 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली. तसेच यातील अल्पवयीन असलेल्या मुलाला त्यांच्या पलकांच्या ताब्यात देण्यात आल्याचेही बनसोडे यांनी सांगितले.