महाराष्ट्र

maharashtra

ऑक्सिजन, रेमडेसिवीर पाठोपाठ आता मुंबईत प्लाझ्माचाही तुटवडा

By

Published : Apr 21, 2021, 10:51 PM IST

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने त्याचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर पडताना दिसून येत आहे. दररोज राज्यात सरासरी 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. ऑक्सिजन, रेमडसिवीर इंजेक्शन याचा तुटवडा भासत आहे. यात भर पडली आहे ती म्हणजे प्लाझ्माची. कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी प्लाझ्माची गरज असते, मात्र याच प्लाझ्माचा तुटवडा मुंबईत दिसून यायला लागला आहे.

ऑक्सिजन, रेमडेसिवीर पाठोपाठ आता मुंबईत प्लाम्झाचाही तुटवडा
ऑक्सिजन, रेमडेसिवीर पाठोपाठ आता मुंबईत प्लाम्झाचाही तुटवडा

मुंबई -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने त्याचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर पडताना दिसून येत आहे. दररोज राज्यात सरासरी 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. ऑक्सिजन, रेमडसिवीर इंजेक्शन याचा तुटवडा भासत आहे. यात भर पडली आहे ती म्हणजे प्लाझ्माची. कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी प्लाझ्माची गरज असते, मात्र याच प्लाझ्माचा तुटवडा मुंबईत दिसून यायला लागला आहे. मुंबईमध्ये रोज सरासरी आठ हजार रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे. मात्र कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दानासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

दररोज 400 ते 500 प्लाझ्मा दात्याची आवश्यकता

मुंबईत आतापर्यंत एकूण 4 लाख 96 हजार 263 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा हा कोरोनाबाधितांच्या उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना वारंवार प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत सध्या दररोज 400 ते 500 प्लाझ्मा दात्यांची आवश्यकता आहे. मात्र त्यातील केवळ 30 ते 40 टक्केच नागरिक प्लाझ्मा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑक्सिजन, रेमडेसिवीर पाठोपाठ आता मुंबईत प्लाम्झाचाही तुटवडा

प्लाझ्मा म्हणजे काय ?

प्लाझ्मा हा आपल्या रक्तातील एक घटक आहे. तांबड्या आणि पांढऱ्या पेशी असतात तसाच रक्तामध्ये एक पिवळ्या रंगाचा तरल पदार्थ असतो त्याला प्लाझ्मा म्हणतात. प्लाझ्मामध्ये 92 टक्के पाणी असतं, तसंच प्रोटीन, ग्लूकोज मिनरल, हार्मोन्स हे घटक देखील असतात.

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?

कोरोना विरोधात लढताना प्लाझ्मा थेरेपीची मदत होत आहे. जो रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, अशा रुग्णांचा प्लाझ्मा रुग्णांच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांत कोरोना विरुद्ध लढण्याच्या ऍंटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळं हा प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यास तो लवकर बरा होतो.

हेही वाचा -सलग दुसऱ्या वर्षीही राम नवमी उत्सवावर कोरोनाचा परिणाम

ABOUT THE AUTHOR

...view details