महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेश मंडळांना वीजदरात सवलत देणार - महावितरणची घोषणा - mumbai MSEB news

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट दराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत असून, मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट दराने तात्पुरती वीजजोडणी देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने केली आहे.

By

Published : Aug 23, 2019, 10:41 AM IST

मुंबई - सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट दराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत असून, मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक मंडळांनी वीज सुरक्षिततेसंदर्भात योग्य उपाययोजना कराव्यात, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

सर्व सार्वजनिक उत्सवांसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) असा वीजदर आकारण्यात येतो. यामुळे अधिक वीज वापरल्यासही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतीयुनिट दर आकारण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले असून, वीजभार ०.५ किव्हो करिता एक हजार रूपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. तचेस गणेशोत्सव संपल्यानंतर संबंधित रक्कम मंडळाच्या खात्यात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे परत करण्यात येईल. मंडळाने सुरक्षितते संदर्भात प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती व मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीने केले आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयं0त्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा मंडपातील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घेण्यासंबंधी माहिती देण्यात आली. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीसाठी 24 तास सेवा असणाऱ्या 1912, 180020023435 किंवा 18002333435 या महावितरणच्या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे महावितरणने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details