मुंबई- कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग पाळून भाजीपाला खरेदीला मुभा दिली आहे. मात्र नागरिक प्रचंड गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आहेत. त्याचा प्रत्यय भायखळा येथे आला.
भायखळ्यात भाजी मंडईसमोर लागल्या रांगा, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - सोशल डिस्टन्सिंग
भाजीपाला खरेदी करण्यासाठी भायखळा येथील बाजारात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी या नागरिकांना एका रांगेत उभे केले.
भाजीपाला खरेदीसाठी झालेली गर्दी
भायखळा येथील बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी या नागरिकांना एका रांगेत उभे केले. मात्र गर्दी प्रचंड असल्याने भाजीपाला खरेदीसाठी मोठी रांग लागली. या रांगेत भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. नागरिक सोशल डिस्टंन्सिंग पाळत नसल्यामुळे नागरिकांना कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.