महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2022, 2:25 PM IST

ETV Bharat / city

AC local Mumbai : प्रचंड गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे होईना बंद , रेल्वे पोलिसांची तारांबळ ; प्रवाशांमध्ये हशा

काल सायंकाळी चर्चगेटवरून सुटलेली एसी लोकल अंधेरी स्थानकात आल्यानंतर ती पुढे जाण्यासाठी शेवटी रेल्वे पोलीसांना पाचारण करण्यात (AC local doors are not closed due to huge crowd) आले. याचं कारण म्हणजे एसी लोकलचे दरवाजे बंद होईनात, इतकी गर्दी त्या गाडीमध्ये झाली (Passengers are laughing at railway police) होती.

AC Local Mumbai
एसी लोकल मुंबई

मुंबई :काल सायंकाळी चर्चगेटवरून सुटलेली एसी लोकल अंधेरी स्थानकात आल्यानंतर ती पुढे जाण्यासाठी शेवटी रेल्वे पोलीसांना पाचारण करण्यात आले. याचं कारण म्हणजे एसी लोकलचे दरवाजे बंद होईनात, इतकी गर्दी त्या गाडीमध्ये झाली (AC local doors are not closed due to huge crowd) होती. हे काही नवीन नाही आहे, नॉन एसी गाड्यांमध्ये गर्दीच्या वेळी प्रवासी लटकून जीवघेणा प्रवास करत असतात हे नेहमीच आहे.

परंतु सध्या पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद भेटत असल्याने गर्दीच्या वेळी एसी लोकलचे दरवाजे बंद व्हायला प्रवाशांना धक्काबुक्की करून डब्यामध्ये सामावून घ्यावे लागते. तरीसुद्धा दरवाजे बंद झाले नाहीत, तर गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे पोलिसांना पाचारण केले (Passengers are laughing at railway police) जाते. असाच प्रकार काल अंधेरी रेल्वे स्थानकात दिसून आला.

एसी लोकल मुंबई गर्दी


सध्या लोकलच्या प्रवाशांची करमणूक -पश्चिम रेल्वेवर एसी लोकलसाठी प्रवाशांचा उदंड प्रतिसाद भेटत आहे. एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी इच्छुक आहेत. चर्चगेट होऊन सुटलेली एसी लोकल जेव्हा अंधेरी स्थानकात आली, तेव्हा ती अगोदरच गर्दीने गच्च भरून गेली होती. अंधेरी ते विरार हा टप्पा गाठण्यासाठी जेव्हा हे प्रवासी यामध्ये चढू पाहत होते, तेव्हा गर्दीमुळे त्यांना आज चढता येत नव्हते. काहीजण बऱ्याच प्रयत्नानंतर आतमध्ये चढण्यात यशस्वी झाले. परंतु ज्या प्रवाशांमुळे दरवाजे बंद होत नव्हते, अशा प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शेवटी रेल्वे पोलिसांना बोलवण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर हे दरवाजे बंद झाले. परंतु हा सर्व नाट्यमय प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला. इतर प्रवाशांनी सुद्धा या प्रसंगाचा मनमुराद आनंद (AC local huge crowd in Mumbai) लुटला.


पुढील महिन्यात नवीन वेळापत्रक ?पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद भेटत आहे. १६ ऑगस्ट रोजी एसी लोकल फेऱ्यांनी एक लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर देखील प्रवासी संख्येस सातत्याने वाढ होत आहे. अनेक प्रवासी संघटनेने एसी लोकल वाढवण्याची लेखी मागणी रेल्वेकडे केली असल्याने नव्या वेळापत्रकात एसी फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या असून यापैकी काही फेऱ्या नवीन, तर काही फेऱ्या साध्या गाड्यांच्या जागी चालवण्यात येणार आहेत. पुढील ऑक्टोंबर महिन्यापासून नवे वेळापत्रक लागू होण्याची शक्यता वर्तवली जात असून या वेळापत्रकात पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी ३० लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन केले असल्याचे समजते आहे. यानुसार दररोज या मार्गावर २२ एसी आणि ८ साध्या लोकल फेऱ्या वाढण्याची चिन्ह (AC local Mumbai) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details