महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'परमबीर सिंग सरकारची पोलखोल करत असल्यानेच संजय पांडेंनी त्यांच्या चौकशीस नकार दिला' - परमबीर सिंग

सरकारच्या आदेशानुसार काम करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे एखाद्या प्रकरणाची चौकशी सरकारने लावल्यास ती मी करू शकत नाही असे सरकारी अधिकारी म्हणू शकत नाही असेही दरेकर यावेळी म्हणाले.

'परमबीर सिंग सरकारची पोलखोल करत असल्यानेच संजय पांडेंनी त्यांच्या चौकशीस नकार दिला'
'परमबीर सिंग सरकारची पोलखोल करत असल्यानेच संजय पांडेंनी त्यांच्या चौकशीस नकार दिला'

By

Published : May 4, 2021, 7:16 AM IST

मुंबई : परमबीर सिंग सरकारची पोलखोल करत असल्याने तसेच संजय पांडेंना स्वतःच एक्सपोज होण्याची भिती वाटत असल्याने त्यांनी सिंग यांची चौकशी करण्यास नकार दिला असावा असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. सरकारच्या आदेशानुसार काम करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे एखाद्या प्रकरणाची चौकशी सरकारने लावल्यास ती मी करू शकत नाही असे सरकारी अधिकारी म्हणू शकत नाही असेही दरेकर यावेळी म्हणाले.

'परमबीर सिंग सरकारची पोलखोल करत असल्यानेच संजय पांडेंनी त्यांच्या चौकशीस नकार दिला'

म्हणून पांडेंची चौकशीतून माघार

प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. यापूर्वी कधीही अधिकाऱ्यांचा वापर, अधिकाऱ्यांमधील इतकी संभ्रम अवस्था पाहायला मिळाली नाही. परमबीर सिंग सरकारचे दूत म्हणून काम करत होते. सरकारच्या विरोधात गेल्यानंतर त्यांच्यावर सरकारने आक्षेप घेतला आहे. याशिवाय महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी सरकारच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. तडजोड करत संजय पांडे यांना डिजी म्हणून निवडण्यात आले आहे. डिजी बनवल्यानंतर सरकारला मदत करण्याबद्दल असलेली वचनबद्धता आणि ही सर्व प्रकरण निपटून देण्यासाठी त्यांना भूमिका त्यांना दिली असून पांडेंनीही हे मान्य केल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला. परमबीर सिंग यांना समजावण्याची भूमिका संजय पांडे यांना देण्यात आली होती. मात्र सिंग हे सरकारची पोलखोल करत असल्यानेच पांडेंनी चौकशीतून माघार घेतल्याचे दरेकर म्हणाले.

पांडेंचे व्हाटसअप चॅट आले बाहेर?

संजय पांडे यांनी कशाप्रकारे परमबीर सिंग यांना समजवण्याचा प्रयत्न केला ते आता बाहेर येत आहे. त्यांनी केलेले संवाद, व्हाटसअप चॅट समोर येत आहे. सरकारच्या विरोधात जाणं योग्य नाही, यंत्रणेशी किती लढाल. तुम्ही एकटे पडाल अशा प्रकारच्या गोष्टी डिजीपी संजय पांडे यांच्या मार्फत सांगण्यात येत आहेत असे दरेकर म्हणाले. परमबीर सिंग यांच्या बोलण्यात तथ्य असावं, त्यांच्या बोलण्यावरून अनेक लोकं अडचणीत येतील अशा प्रकारचं चित्र दिसून येत आहे. डिजीपी संजय पांडे यांच्या मार्फत परमबीर सिंग यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details