महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आयपीएस परमबीर सिंह दोन महिन्यांच्या सुट्टीवर; ५ मे पासून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे - Param Bir Singh on leave

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ॲन्टिलिआ इमारतीच्या बाहेर काही अंतरावर स्कॉर्पियो गाडीतील सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात निष्काळजीपणा बाळगला गेल्याचं म्हणत तडकाफडकी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली होती.

परमबीर सिंह दोन महिन्यांच्या सुट्टीवर
परमबीर सिंह दोन महिन्यांच्या सुट्टीवर

By

Published : Jun 28, 2021, 11:26 AM IST

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला परमबीर सिंह हे चंदिगड येथे असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तेथील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे परमबीर हे 5 मे पासून सुट्टीवर गेले असल्याचे समोर येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ॲन्टिलिआ इमारतीच्या बाहेर काही अंतरावर स्कॉर्पियो गाडीतील सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात निष्काळजीपणा बाळगला गेल्याचं म्हणत तडकाफडकी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली होती.

या घडामोडीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यावर मुंबईतील 1700 हून अधिक बार मालकांकडून 100 कोटी रुपये दर महिना वसूल करण्यास भाग पाडले होते, असा आरोप केला होता. यानंतर काही दिवसातच कोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली. त्यामुळे गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

कार्यालयाचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे-

या दरम्यान परमबीर सिंग या आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात मुंबई पोलीस खात्यातील काही पोलीस निरीक्षकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावरून परबीरसिंग यांच्या विरोधातही लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, राज्याच्या गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर 5 मे पासूनच परमबीर सिंग हे त्यांच्या कार्यालयात येत नसल्याचं समोर आले आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या कार्यालयाचा अतिरिक्त भार हा सिव्हिल डिफेन्सचे प्रमुख आयपीएस के व्यंकटेशन यांच्याकडे देण्यात आलेला असल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details