मुंबई -मुंडे-महाजन ( Gopinath Munde Pramod Mahajan ) यांच्या लेन्समधून स्वतःला मोठे करत, पवार ( Sharad Pawar ) यांच्या लेन्समधून बघण्याचे भाग्य धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांना मिळाले, असा खोचक टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे ( BJP Leader Pankaja Munde ) यांनी यांना धनंजय मुंडे यांना लगावला आहे. तर धनंजय मुंडे ( Dhanajay Munde Replied To Pankaja Munde ) यांनी पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीच्या लेन्समधून बघायला हवे, असे सांगत खुली ऑफर दिली. पंकजा मुंडे यांनी देखील दिलखुलास दाद देत धनंजय मुंडे ऑफर नाकारली. सभागृहात यावेळी एकच हशा पिकला. भाषणासाठी जाताना व्यासपीठावर बसलेल्या पंकजा ताईच्या डोक्यात धनंजय मुंडे यांनी प्रेमाने टपली मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंडे बंधू भगिनीमधलं हे नातं बघायला मिळालं. नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ रुग्णालयाचा लोकापर्ण सोहळा मुंबईत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अमित देशमुख, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आदी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे -अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस आज कोणाकडेही नसतील. असे शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील, असे बाळासाहेब थोरात, नवीन दृष्टी देण्याची अपेक्षा असणारे, ज्यांच्या लेन्सेसकडे युवक आज बघत आहेत, असे आदित्य ठाकरे, सोफिस्टिकेटेड लेन्सेस अमित देशमुख आणि मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत: ला मोठ करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचे भाग्य खूप कमी लोकांना लाभले. त्यातील एक आमचे बंधू धनंजय मुंडे' असा उल्लेख करत पंकजा मुंडेंनी भाषणाची सुरुवात केली. मला आणखी चष्मा लागला नाही, पण माझ्या भावाला चष्मा लागल्याची कोटी केली. तसेच रघुनाथ मुंडे विरोधात गोपीनाथ मुंडे यांनी लढवलेल्या निवडणुकीची आठवण करुन दिली. दोघांच्या राजकारणाच्या पलिकडे प्रेम होते, असे सांगत धनंजय मुंडेंना कोपरखळी मारली.