मुंबई : भाजपने आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर ( BJP MLC Candidate List 2022 ) केली. त्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे ( BJP National Leader Pankaja Munde ) यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. मध्यंतरी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत केलेल्या आंदोलनाला लोकल नेत्यांचे आंदोलन ( Devendra Fadnavis Aurangabad Agitation ) म्हणून मुंडे यांनी उल्लेख केला होता. याच कारणामुळे पंकजा मुंडे यांची उमेदवारी डावलण्यात आली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
भाजपकडून आज पाच नेत्यांची नावे विधानपरिषदेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये माजी मंत्री राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांचा समावेश आहे. या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत होती. मात्र यादीत नाव नसल्याने आता पंकजा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.