महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मतदानाची शाई दाखवा ५० टक्के सवलत मिळवा; भांडूपच्या दुकानदाराची जनजागृती

जास्तीत जास्त लोकांनी यावेळी मतदान करावे, यासाठी भांडूपच्या दुकानदाराने अनोखी योजना जाहीर केली आहे. लोकसभेसाठी मतदान करा, हातावरची शाई दाखवा आणि फरसाण व दुकानात मिळणाऱ्या इतर खरेदीत ५० टक्के सवलत मिळवा.

By

Published : Apr 5, 2019, 12:00 PM IST

दुकानदार कीर्ती शहा

मुंबई- लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. जास्तीत जास्त लोकांनी यावेळी मतदान करावे, यासाठी भांडूपच्या दुकानदाराने अनोखी योजना जाहीर केली आहे. लोकसभेसाठी मतदान करा, हातावरची शाई दाखवा आणि फरसाण व दुकानात मिळणाऱ्या इतर खरेदीत ५० टक्के सवलत मिळवा. अशा योजनेमुळे लोक जास्तीत जास्त मतदान करतील, असा विश्वास दुकानदार कीर्ती शहा यांनी व्यक्त केला आहे.


निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग, विविध सामाजिक संस्था जनजागृती करीत असतात. तर काही व्यक्ती देखील वैयक्तीक पातळीवर नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून प्रयत्न करीत असतात. भांडूपच्या स्वस्तिक फरसाण मार्टने मतदान करा आणि कोणत्याही खाद्य पदार्थावर ५० टक्के डिस्काउंट मिळवा अशी योजना राबवली आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केलेली बोटाची शाई दाखवून हा डिस्काउंट मिळवता येणार आहे. गेल्या लोकसभेपासून स्वस्तिक फरसाण मार्ट ही योजना राबवित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीला दोन हजार पेक्षा जास्त मतदारांनी या योजनेचा लाभ घेतला. या वेळी देखील या योजनेचा मतदान वाढविण्यासाठी फायदा होईल, अशी आशा या फरसाण मार्टचे मालक कीर्ती शहा यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details