मुंबई - शेतकऱ्यांना दिलेलं वचन सरकार विसरलं. ९४ हजार हेक्टवरच्या शेतकऱ्यांना सरकारनं पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळाचे कामकाज संस्थगित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कर्जमाफीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरसकट कर्जमाफी करू असे सरकार म्हणाले होते, असे आश्वासन सरकारने दिले होते. तेही त्यांनी पाळले नाही. एका गावातल्या 25 ते 30 टक्के शेतकऱ्यांची नावे नाहीत. दुसरीकडे सीएए, एनआरसी, एनपीआरबाबत आम्ही प्रस्ताव दाखल केला होता, पण सरकारने तो चर्चेला घेतला नाही.