मुंबई - विरोधकांनी गंभीर आरोप केल्यामुळे सरकारने आज विधानसभेत पुरवणी मागण्यांपासून पळ काढला. आम्ही उपस्थित केलेल्या कोरोना प्रश्नांबाबत सत्ताधाऱयांनी काही उत्तर दिले नाही. आम्हाला अपेक्षित उत्तरे मिळाले नाहीत. या अधिवेशनाने सामान्य माणसाच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला. कष्टकरी जनतेला पॅकेज घोषित होईल, अशी अपेक्षा होती. तीही सरकारने पूर्ण केली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
'गंभीर आरोप केल्यामुळे सरकारने विधानसभेतून पळ काढला' - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बातमी
'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' ही चांगली योजना आहे. परंतु, घरातून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी थोडे आत्मपरीक्षण केले पाहिजे. महाराष्ट्र हे सरकारचे कुटुंब आहे. त्याची जबाबदारी ते घेतील का? असा प्रश्न फडणवीस यांनी केला.

महालेखापाल यांच्या अहवालात फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारावर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, कॅग अहवाल आला आहे. तो तुम्ही नीट वाचलेला नाही. काही ठराविक योजनांवर कॅगने बोट ठेवले आहे. अनेकवेळा अहवाल येतात, मात्र याचा अर्थ ठपका ठेवला नाही, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.